पुरंदर तालुक्यातील बोपगांव मध्ये दुष्ळकाग्रस्त भागातील जनावरासाठी 14 टन चाऱ्याचे वाटप..
बोपगावमध्ये दुष्काळग्रस्त भागातील जनावरांसाठी १४ टन चाऱ्याचे वाटप..
पुरंदर तालुक्यातील वाढत्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बोपगाव येथील सुपुत्र सुनील विठ्ठल फडतरे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने गावातील जनावरांसाठी तब्बल १४ टन चाऱ्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील सुमारे ७०० दुभत्या जनावरांना तीन दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध झाला. या सामाजिक उपक्रमावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संदीप फडतरे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य योगेश नाना फडतरे, मारुती फडतरे, सुदाम फडतरे, राम फडतरे, निवृत्ती फडतरे, सर्जेराव फडतरे, नागेश फडतरे, अशोक फडतरे, सोपान फडतरे, शांताराम जगदाळे, राजेंद्र फडतरे, राहुल फडतरे, काळूराम फडतरे, विजय फडतरे, विजय जगदाळे, संभाजी फडतरे, भाऊसाहेब फडतरे, मस्कु फडतरे यांच्यासह अनेक शेतकरी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी ग्रामस्थांनी सुनील फडतरे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप, अंत्यविधीसाठी रथ उपलब्ध करून देणे तसेच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. दुष्काळाच्या संकटात जनावरांसाठी चाऱ्याची मदत करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. सुनील फडतरे व त्यांच्या कुटुंबीयांच्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले. दुष्काळाच्या काळात शेतकरी आणि पशुपालकांना दिलासा देणारा हा उपक्रम ठरत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
What's Your Reaction?