बारामतीतील कृषी प्रदर्शनात शेती पिकासह टॉय श्वानाची स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी
कृषी प्रदर्शनात या टॉय या श्वानाची स्पर्धा मोठ्या दिमाखात पार पडली
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. आज अहिल्यानगर, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर येथील जिल्ह्यांमधून येथील शेतकऱ्यांनी प्रदर्शन स्थळी गर्दी केली होती.
आजच्या प्रमुख भेटीमध्ये श्रीमती. अंजली रमेश, आय. ए. एस, मृदा व जलसंधारण आयुक्त, संभाजीनगर, मा. श्री. युगेंद्र दादा पवार, उद्योजक यांचा समावेश होता. त्यांचे स्वागत ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो. निलेश नलावडे यांनी केले. नंतर मान्यवरांनी प्रदर्शनास भेट दिली.
आज प्रदर्शनाच्या अनुषंगाने ‘टॉय’ या जातींच्या श्वानांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना मा. श्री. युगेंद्र दादा पवार यांच्या हस्ते ट्रॉफी चे वितरण करण्यात आले.
श्वान स्पर्धातील विजेते व पारितोषिके -
• प्रथम क्रमांक: श्री. किरण दळवी, ब्रीड – पोमिग्रेन , रु. ५,०००/- + ट्रॉफी
• द्वितीय क्रमांक: श्री. कार्तिक शिंदे , ब्रीड – शिझू , रु. ३,०००/- + ट्रॉफी
• तृतीय क्रमांक: श्री. आकाश मोरे , ब्रीड – कॉकर स्पायनर रु. २,०००/- + ट्रॉफी
• उत्तेजनार्थ : श्री. गौरव नलावडे , ब्रीड – छीवावा + ट्रॉफी
What's Your Reaction?