बारामतीतील मळद येथे विषमुक्त शेती आणि महिला आरोग्य जागरूकता या विषयावर कृषिदुतांनी सखोल केले मार्गदर्शन

Jun 19, 2026 - 11:53
Jun 19, 2026 - 11:55
 0  38
बारामतीतील मळद येथे विषमुक्त शेती आणि महिला आरोग्य जागरूकता या विषयावर कृषिदुतांनी सखोल केले मार्गदर्शन

मळद येथे 'विषमुक्त शेती आणि महिला आरोग्य जागरूकता' या चर्चासत्राचे आयोजन संपन्न

एग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय (बारामती) ,या मध्ये शिकत असलेल्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थींनिंनीच्या वतीने मळद येथील जिल्हा परिषद शाळेत बुधवारी (दि.१७) विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'विषमुक्त शेती (कीटकनाशकांचे दुष्परिणाम) आणि महिला आरोग्य जागरूकता' या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात उपस्थित तज्ज्ञ मार्गदर्शकांनी रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर आणि शेतीवर होणाऱ्या घातक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली. डॉ. अतुल गोंडे, प्रा. शरद दळवे आणि डॉ. सुमेधा शेजुल-पाटील (तज्ज्ञ कीटक शास्त्र, कृषी महाविद्यालय, बारामती) यांनी शेतकऱ्यांना सुरक्षित आणि विषमुक्त शेती पद्धती अंगीकारण्याचे आवाहन केले. ज्योती शिंदे (अनुलोम भाग संवादिनी बारामती) यांनी सरकारी योजनांवर महिलांना मार्गदर्शन केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव २०२६-२७ कार्यक्रमाचा भाग म्हणून मळद येथे मुक्कामी असलेल्या चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थीनी गटाने या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले. यामध्ये मयुरी लोंढे, सानिका जाधव, तेजस पालखेडे, साक्षी धुमाळ, प्रांजली कांबळे आणि खुशी कांबळे या कृषीदुतांचा समावेश होता. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनींना संस्थेचे चेअरमन मा. राजेंद्रदादा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. निलेश नलावडे, प्राचार्या जया तिवारी, कार्यक्रम समन्वयक प्रा. निळकंठ जंजिरे आणि कार्यक्रम अधिकारी डॉ. मयूर पिसाळ, डॉ. पल्लवी कोळेकर, प्रा. शिवानी कोकरे-देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow