बारामतीतील डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना 24 तास सुविधा मिळेना..
बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना 24 तास सुविधाचा अभाव..
झारगडवाडी चे सरपंच अजित बोरकर यांनी तालुका अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देऊन केली कारवाई करण्याची मागणी..
डोर्लेवाडी : केंद्र सरकार आणि राज्य सरकारने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावागावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच रुग्णालये उभारण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार लोकप्रतिनिधी असलेल्या बारामती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 24 तास सेवा तर सोडाच पण रुग्णांना सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यांना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत आलेल्या रुग्णांना औषधे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे मग शासनाच्या आरोग्य विभागाकडून आलेली औषधे जातात कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत झारगडवाडी चे सरपंच अजित बोरकर यांच्याकडे गावातील अनेक जणांनी रुग्णालयातील सेवे बाबत तक्रारी केल्या होत्या. यावर झारगडवाडी चे सरपंच यांनी स्वतः आज शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान आपल्या स्वतःच्या मुलाला घेऊन अचानक पाहणी करण्यासाठी रुग्णालयात भेट दिली असता त्या पाहणीत त्यांना वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णालयात नसल्याचे आढळून आले. त्यांनी फोनद्वारे थेट बारामती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांच्याकडे फोन द्वारे माहिती देत डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची झारगडवाडी ग्रामपंचायत च्या वतीने लेखी तक्रार दिली आहे तालुका अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी झारगडवाडी चे सरपंच अजित बोरकर यांनी केली आहे.
प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये 24 तास सेवा मिळणे बंधनकारक आहे तसेच वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी आरोग्य केंद्रात असणे बंधनकारक आहे पण बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र सकाळची ओपीडी झाल्यानंतर वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी गायब होतात. यामुळे आलेल्या रुग्णांना उपचाराविनाच घरी परतावे लागत आहे. सर्वसामान्य असलेल्या रुग्णांना खाजगी रुग्णालयात पैसे अभावी उपचार घेणे शक्य नसते यामुळे अनेक गरीब रुग्ण शासकीय रुग्णालयात जाऊन उपचार घेत असतात मात्र शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी उपलब्ध नसतील तर उपचार कुठून मिळणार? यामुळे रुग्णालयात ऑन कर्तव्यावर असलेल्या आणि रुग्णालयात उपलब्ध नसलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर आरोग्य विभागाकडून कारवाई होणे गरजेचे आहे.
डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ओपीडी सुरू होते, पण दुपारी एकची ओपीडी झाल्यानंतर येथे कोणीच नसते. रात्रीच्या वेळी अनुचित प्रकार, घटना घडल्यास काय करावे? नर्स नाही, डॉक्टर नाही. एखाद्या रुग्णाची, किंवा विद्यार्थ्याची तब्येत खराब झाली तर आठ दहा किलोमीटर दूर बारामतीला जावं लागतं. या वेळेत काही अनुचित प्रकार घडू शकतो याला जबाबदार कोण? "आरोग्य विभागाच्या नियमांनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास सेवा देणे बंधनकारक आहे. पण इथे ओपीडी नंतर सर्वजण गायब! मग सरकारी रुग्णालयातीलही 24 तास सेवा कुठे गेली? "सरकारी रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी यांची सेवा काय? करदात्यांचे पैसे यात खर्च होतात, पण सेवा मिळत नाही. प्रशासन काय करणार? आरोग्य विभागाच्या नियमांनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास सेवा देणे बंधनकारक आहे. पण इथे ओपीडी नंतर सर्वजण गायब!
कोट : याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनोज खोमणे यांना विचारणा केली असता त्यांनी या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
What's Your Reaction?