सोमवारी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुक मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज.. जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांची माहिती

Feb 8, 2026 - 18:57
 0  191
सोमवारी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुक मतमोजणीच्या प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज.. जिल्हाधिकारी जितेंद्र डूड्डी यांची माहिती

मतमोजणी प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यात जिल्हापरिषदा व पंचायतीसमितीकरिता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदानप्रक्रिया पार पडली; या निवडणुकीकरिता ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होणार आहे, याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.

या मतमोजणीच्या कामकाजाकरिता पुरेशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. निकालाच्यादिवशी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याकरिता पर्याप्त व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात असून त्याअनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून मतमोजणी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने प्रत्येक मतमोजणी केंद्रावर आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरिता संबंधित कर्मचारी, उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेशिकाही देण्यात आलेल्या आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींना फेरीनिहाय निकाल तातडीने उपलब्ध करून देण्याकरिता मतमोजणी केंद्रावर स्वतंत्र बैठक व्यवस्था (माध्यम कक्ष) तयार करण्यात आले आहेत.

संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचा आढावा घेऊन अचूक व सुयोग्य पद्धतीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्याकरिता काटेकोर नियोजन व रंगीत तालीम घेण्याबाबत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये मतमोजणी केंद्र खालील प्रमाणे..

जुन्नर - श्री लेण्याद्री गणपती फक्त निवास भाग क्रमांक दोन गोळेगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे 

आंबेगाव- शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय अवसरी खुर्द तालुका आंबेगाव जिल्हा पुणे 

शिरूर - महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोदाम रांजणगाव एमआयडीसी कारेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे 

खेड - हुतात्मा शिवराव हरी राजगुरू तालुका क्रीडा संकुल तिन्हे वाडी तालुका खेड जिल्हा पुणे 

मावळ - तहसील कार्यालय मावळ वडगाव नवीन इमारत तालुका मावळ जिल्हा पुणे 

मुळशी - राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिक शाळा कासार आंबोली तालुका मुळशी जिल्हा पुणे येथील सभागृह 

हवेली- सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग आंबेगाव बुद्रुक सेंट्रल लायब्ररी समोर जिल्हा पुणे 

दौंड - शासकीय धान्य गोदाम नगर मोरे चौक दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे 

पुरंदर - नवीन प्रशासकीय इमारत तळमजला सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे 

वेल्हे - शासकीय धान्य गोदाम राजगड वेल्हे तालुका राजगड जिल्हा पुणे 

भोर - कान्होजी जेधे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मांढरदेवी रोड भोर 

बारामती - जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल बारामती 

इंदापूर - शासकीय धान्य गोदाम कालठण रोड इंदापूर जिल्हा पुणे 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow