झारगडवाडीच्या राणाप्रताप पतसंस्थेचा सभासदांना ९ टक्के लाभांश वाटप..

Sep 16, 2026 - 19:24
 0  11
झारगडवाडीच्या राणाप्रताप पतसंस्थेचा सभासदांना ९ टक्के लाभांश वाटप..

झारगडवाडी येथील संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न..

झारगडवाडीच्या राणा प्रताप पतसंस्थेचा सभासदांना ९ टक्के लाभांश वाटप..

राणा प्रताप पतसंस्थेने महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिली ५१ हजारांची मदत..

झारगडवाडी ( ता.बारामती ) येथील राणा प्रताप ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष तथा बारामती तालुका पतसंस्था फेडरेशनचे संचालक नानासाहेब झारगड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. यावेळी संस्थेच्या सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर करून वाटप करण्यात आला.

संस्थेने आर्थिक व्यवहारांसोबतच सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यामध्ये संजय निकम, पत्रकार नवनाथ बोरकर, ॲड. हर्षल निकम, ॲड. प्रमोद व्होरकटे, ॲड. षण्मुख देवकाते, पोलीस सिमरन बेग व कैलास नाळे यांचा, तसेच गुणवंत विद्यार्थी वैष्णवी साळुंखे, विद्या मदने, ओम साळुंखे, अथर्व झारगड, समृद्धी खापे व निहारिका निकम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. संस्थेकडे सध्या एकूण १,६३७ सभासद असून, भागभांडवल ९३ लाख रुपये आहे. चालू आर्थिक वर्षात संस्थेकडे १५ कोटी रुपयांच्या ठेवी असून, एकूण कर्जवाटप ११ कोटी ९४ लाख रुपये झाले आहे. तसेच विविध बँकांमध्ये ४ कोटी २१ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, संस्थेच्या वतीने महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव दिलीप झारगड व व्यवस्थापक हनुमान शिंदे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. यावेळी बारामती तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष तानाजी करचे, स्वराज्य शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष नवनाथ बोरकर, राणा प्रताप संस्थेचे नूतन अध्यक्ष संजय निकम, आबासो देवकाते, किरण चौधरी, हनुमंत देवकाते, आप्पासो मदने आदी उपस्थित होते. संचालक संदीप दळवी यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक सागर देवकाते यांनी आभार मानले.

फोटो : झारगडवाडी ता. बारामती येथील महादेव मंदिरामध्ये राणा प्रताप पतसंस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow