बारामतीतील पहिल्या मानाच्या श्री मंडई गणपतीला आंबा व केळीचे आरास
अंगारक चतुर्थी निमित्त मानाच्या श्री मंडई गणपतीला उटी चार लेप..
श्री मंडई गणपतीला 51 डझन आंब्याची, 21 डझन केळींची आरास..
बारामती : मंगळवारी अंगारक चतुर्थी सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रचंड ऊन व उष्णता वाढत चाललेला पारा यामुळे बाप्पांच्या मूर्तीची उष्णता दाह कमी व्हावी या उद्देशाने प्रति वर्ष प्रमाणे बारामतीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या पहिल्या श्री मंडई गणपतीला चंदन, केशर, गोपीचंद, व विविध थंडावा देणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पती यांच्यापासून बनवलेला उटीचा लेप लावण्यात आला तसेच 51 डझन आंब्यांचा महानैवेद्य, 21 डझन केळींची आरास, अकरा किलो मोगरा, गुलाब, चाफा ,हरळी, झेंडू, आंब्याच्या पानांची सजावट करण्यात आली होती ती पाहण्यासाठी व बाप्पांचे विलोभनीय व मनमोहक रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासाठी असंख्य बारामतीतील गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
परिसरामध्ये आलेल्या भक्तांना थंडावा मिळावा व वातावरण थंड राहो यासाठी मोठमोठे कुलर व थंड पेय देण्यात येत होते. रात्री उशिरा 10 वाजून 13 मिनिटांनी चंद्रोदयानंतर श्रींची आरती करून हे सर्व फळे भक्तांमध्ये प्रसाद म्हणून वाटण्यात आले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन अखिल मंडई मंडळ ट्रस्टच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष निलेश धालपे, आशिष घोरपडे, पप्पू धनराळे ,अक्षय नवले, स्वप्निल खरात, आबा वाडीले, मंदार कळसकर, सागर राऊत, चेतन वाडेकर, निखिल शेडगे, आनंद खुळपे ,बाबु धनराज या सर्वांनी ही सजावट व कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
What's Your Reaction?