बारामतीत डॉल्बीच्या कर्कश आवाजात श्रियाळ यष्टि; महिलांचा पारंपरिक सण हिरावला!

Aug 19, 2026 - 10:57
Aug 19, 2026 - 11:04
 0  24

डॉल्बीच्या कर्कश आवाजात श्रियाळ यष्टि; महिलांचा पारंपरिक सण हिरावला!

एकाच चौकात तब्बल दोन तास डॉल्बीचा कर्णकर्कश आवाज..

वयस्कर व्यक्ती आणि लहान मुलांना डॉल्बीच्या आवाजाचा प्रचंड मानसिक त्रास..

बारामती : बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथे मंगळवारी श्रियाळ यष्टि उत्सव पारंपरिक पद्धतीऐवजी तब्बल चार डॉल्बीच्या दणदणाटात साजरा करण्यात आला. कर्णकर्कश आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले, तर महिलांना घराबाहेर पडणेही मुश्किल झाले.. श्रियाळ यष्टीनिमित्त सक्रोबासमोर महिला पारंपरिक फुगड्या आणि गाणी म्हणत उत्सव साजरा करतात. मात्र, यंदा काही तरुणांनी डॉल्बी लावून मिरवणूक काढली. विशेष म्हणजे, एकाच चौकात तब्बल दोन तास डॉल्बीचा मोठा आवाज सुरू होता. या मिरवणुकीत बाहेरगावातील मोठ्या संख्येने तरुण सहभागी झाल्याचेही सांगण्यात येत आहे..

पारंपरिक सणाचा डॉल्बीच्या दणदणाटात विसर पडल्याने महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. “आम्हाला आमचा पारंपरिक सण साजरा करता आला नाही,” अशी खंत महिलांनी व्यक्त केली..

डॉल्बीच्या कर्कश आवाजावर नियमांनुसार कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आता बारामती शहर पोलीस डॉल्बी मालक आणि आयोजकांवर नेमकी काय कारवाई करणार? याकडे डोर्लेवाडीकरांचे लक्ष लागले आहे..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow