बारामतीतील प्रदर्शन शेतकऱ्यासाठी ज्ञानवर्धक तंत्रज्ञान आधारित आणि अनुभव समृद्ध ठरणारे शेतीच्या आधुनिक वाटचालीस दिशा देणारे कृषी प्रदर्शन
बारामतीतील प्रदर्शन शेतकऱ्यासाठी ज्ञानवर्धक तंत्रज्ञान आधारित आणि अनुभव समृद्ध ठरणारे शेतीच्या आधुनिक वाटचालीस दिशा देणारे कृषी प्रदर्शन
बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी राज्याच्या विविध भागांतून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. विशेषतः नांदेड, बीड, जालना, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांनी प्रदर्शन स्थळी गर्दी केली होती. शेतीसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक यंत्रसामुग्री व अवजारांकडे शेतकऱ्यांचा विशेष कल दिसून आला. यामध्ये फवारणी यंत्रे, आंतरमशागतीसाठी उपयुक्त यंत्रे, तसेच विविध प्रकारच्या सूक्ष्म सिंचन प्रणालींबाबत माहिती घेताना शेतकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यासोबतच मधुमक्षिका पालन, मत्स्यपालन, तसेच कमी खर्चातील शेडनेटमधील भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान यांसारख्या विषयांवर शेतकऱ्यांनी तज्ज्ञांशी सखोल चर्चा करून उपयुक्त मार्गदर्शन घेतले.
या प्रदर्शनाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे पश्मी व कारवान या जातींच्या श्वानांची स्पर्धा होय. या स्पर्धेतील विजेत्यांना ट्रस्टचे विश्वस्त मा. श्री. रणजीत पवार, केव्हीके, बारामतीचे माजी विषय विशेषज्ञ डॉ. रतन जाधव त्सेह्क इतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सदर श्वान स्पर्धेसाठी निवड समितीमध्ये डॉ. बी. एन. आंबोरे, डॉ. ए. व्ही. खानविलकर, डॉ. टी. सी. शेंडे (पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ) तसेच श्री. तेजस कळमकर, पुणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या स्पर्धेमध्ये ५१ विविध जातीच्या श्वान मालकांनी सहभाग घेतला.
श्वान स्पर्धा – विजेत्याचे नाव व बक्षिसाचे स्वरूप
१. पश्मी ब्रीड – (Adult Female)
प्रथम क्रमांक - श्री. सागर जामदार, बारामती, रु. ५०००/- + ट्रॉफी, द्वितीय क्रमांक - श्री. बापू गोफणे, सोमंथळी ता. फलटण, रु. ३०००/- + ट्रॉफी, तृतीय क्रमांक – श्री. समाधान वरी, पंढरपूर, रु. २०००/- + ट्रॉफी
२. पश्मी ब्रीड – (Adult Male)
प्रथम क्रमांक - श्री. सचिन मुळे , सांगली, रु. ५०००/- + ट्रॉफी, द्वितीय क्रमांक - श्री. धनंजय महामुलकर, फलटण. रु. ३०००/- + ट्रॉफी, तृतीय क्रमांक – श्री. अमोल करपे, बीड., रु. २०००/- + ट्रॉफी
३. कारवान ब्रीड – (Adult Female)
प्रथम क्रमांक - श्री. प्रमोद साळुंखे, मिरज. रु. ५०००/- + ट्रॉफी, द्वितीय क्रमांक - श्री. सुयोग शिंदे, बारामती. रु. ३०००/- + ट्रॉफी, तृतीय क्रमांक – श्री. धनराज खरात, बारामती. रु. २०००/- + ट्रॉफी
४. कारवान ब्रीड – (Adult Male)
प्रथम क्रमांक - श्री. सुरज पाटील, मिरज. रु. ५०००/- + ट्रॉफी, द्वितीय क्रमांक - श्री. कृष्णा शिंदे, मेडद ता.बारामती. रु. ३०००/- + ट्रॉफी, तृतीय क्रमांक – श्री. विश्वजित पवार, शारदानगर, बारामती. रु. २०००/- + ट्रॉफी
एकूणच, शेतकऱ्यांसाठी ज्ञानवर्धक, तंत्रज्ञानाधारित आणि अनुभवसमृद्ध ठरणारे हे कृषी प्रदर्शन शेतीच्या आधुनिक वाटचालीस निश्चितच दिशा देणारे ठरत आहे.
What's Your Reaction?