बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशनची स्थापना; अध्यक्षपदी विशाल साळुंखे, उपाध्यक्षपदी प्रशांत कुचेकर
बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशनची स्थापना; अध्यक्षपदी विशाल साळुंखे, उपाध्यक्षपदी प्रशांत कुचेकर
विजयादशमीच्या मुहूर्तावर छायाचित्रकारांची एकजूट; स्व. अजितदादांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करून संघटनेच्या कार्याचा प्रारंभ
बारामती : छायाचित्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, व्यावसायिक अडचणींचे निराकरण आणि छायाचित्रकारांच्या हितासाठी संघटितपणे काम करण्याच्या उद्देशाने विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर बारामती तालुका फोटोग्राफर असोसिएशनची अधिकृत स्थापना करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी विशाल साळुंखे, तर उपाध्यक्षपदी प्रशांत कुचेकर आणि महेश रोकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संघटनेच्या कार्याचा शुभारंभ करण्यापूर्वी तालुक्यातील छायाचित्रकारांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतिस्थळी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित छायाचित्रकारांनी एकजुटीने काम करण्याची आणि तालुक्यातील प्रत्येक छायाचित्रकाराच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने प्रयत्न करण्याची शपथ घेतली.
बारामती शहरासह तालुक्यातील विविध गावांमधील ज्येष्ठ आणि युवा छायाचित्रकार या उपक्रमात सहभागी झाले होते. छायाचित्रकारांच्या व्यवसायासमोरील आव्हाने, त्यांच्या समस्या आणि व्यावसायिक हिताचे प्रश्न संघटितपणे सोडविण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ असावे, या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी दिलेले योगदान आणि त्यांची कार्यपद्धती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेत छायाचित्रकारांच्या सर्वांगीण हितासाठी संघटना प्रभावीपणे काम करेल, असा विश्वास नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित पदाधिकारी
- अध्यक्ष : विशाल साळुंखे
- उपाध्यक्ष : प्रशांत कुचेकर, महेश रोकडे
- सचिव : संतोष चौधरी
- खजिनदार : बाळासाहेब कारंडे
- कार्याध्यक्ष : सागर सूळ
- सल्लागार : सचिन सावंत, तृणाल गायकवाड
- पदाधिकारी : गौरव होले, स्वप्नील शिंदे, प्रीतम कुंभार, महेंद्र जगदाळे, अक्षय शेळके
या प्रसंगी ज्येष्ठ छायाचित्रकार शंकर शिंदे, योगेश दुर्गे, अतुल चव्हाण, अजित स्वामी यांच्यासह बारामती तालुक्यातील अनेक छायाचित्रकार उपस्थित होते.
छायाचित्रकारांच्या एकजुटीला बळ देत, त्यांच्या हक्कांसाठी आणि व्यावसायिक प्रगतीसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प या नव्या संघटनेच्या स्थापनेनिमित्त व्यक्त करण्यात आला.
What's Your Reaction?