बारामतीतील पहिल्या मानाच्या श्री मंडई गणपती बाप्पाचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..

Jan 22, 2026 - 23:26
 0  29
बारामतीतील पहिल्या मानाच्या श्री मंडई गणपती बाप्पाचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..

बारामतीतील पहिल्या मानाच्या श्री मंडई गणपती बाप्पाचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा..

बारामती शहरातील विविध ठिकाणी श्री गणेश जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बारामतीकरांचे श्रद्धास्थान असलेला बारामतीचा महाराजा मानाचा पहिला श्री मंडई गणपती बाप्पांच्या जन्म सोहळ्यानिमित्त सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत श्रींना सार्वजनिक अभिषेक करण्यात आला अकरा वाजता श्रींना अलंकार घालण्यात आले दुपारी 12 वाजता श्रींचा जन्म सोहळा झाला त्यानंतर न पाळणा म्हणण्यात आला व महाआरती करण्यात आली यावर्षी श्री मयुरेश्वर पांढरे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करण्यात आली संध्याकाळी 7 वाजता पुन्हा आरती होऊन श्रींच्या महाप्रसाद अन्नदानला सुरुवात झाली सायंकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत महाप्रसाद अन्नदान करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री निलेश धालपे, आशिष घोरपडे,अक्षय नवले, महावीर जवारे सोमा धनराळे,स्वप्निल खरात, अश्विन भोकरे विनीत बहाद्दूरकर आनंद खुळपे चेतन वाडेकर,मंगेश पवार, मनोज भागवत, ऋषिकेश राऊत, अक्षय मोरे व इतर मंडळातील सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow