इंदापुरात ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात..
इंदापुरात ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात
अपघातात ट्रॅक्टर ट्रकचा अग्नीतांडव ; अपघातामध्ये दोन्ही वाहनांनी अचानक घेतला पेट..
ट्रॅक्टरसह चालकही जळून खाक...
पुण्याच्या इंदापुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहेइंदापूरच्या पिंपळे येथे भिगवण बारामती राज्य मार्गावर रात्री साडेदहाच्या सुमारास ऊस वाहतूक ट्रॅक्टर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला.. या अपघातात ट्रॅक्टर हा ट्रकच्या खाली शिरल्याने ट्रॅक्टरचे दोन भाग झाले यामध्ये ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर मध्ये अडकून राहिला या अपघातात ट्रकचाही दाबा सुटला आणि ट्रक उलटला.. अपघात एवढा भयानक होता की या भीषण अपघात दोन्हीही वाहनांनी मोठ्या प्रमाणात अचानक पेट घेतला आणि यामध्ये ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर मध्ये अडकल्याने ट्रॅक्टर चालकाचा दुर्दैवी या आगीमध्ये होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.. परंतु ट्रक चालक मात्र आढळून आला नाही. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहिती नुसार ट्रक चालक बचावासाठी तिथून पळून गेल्याच नागरिकांनी सांगितला आहे.. यावेळी भिगवण बारामती रोडवर दोन तासाहून अधिक काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, यावेळी भिगवण पोलिसांनी आणि अग्निशामक दलाला पाचारण केले मात्र तोपर्यंत आगीमध्ये दुर्दैवी ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला याबाबत भिगवण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास भिगवण पोलीस करत आहेत..
What's Your Reaction?