बारामतीत वाहतूक पोलिसांची फटाका बुलेट धारकांवर कडक कारवाई..

Dec 7, 2025 - 16:54
 0  66
बारामतीत वाहतूक पोलिसांची फटाका बुलेट धारकांवर कडक कारवाई..

बारामतीत वाहतूक पोलिसांची फटाका बुलेट स्वरांवर कारवाई..

पोलिसांनी 30 बुलेट चे सायलेन्सर काढून केले जप्त..

बारामतीत शनिवारी सायंकाळी भिगवन चौकात वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.. बुलेटच्या कर्कश आणि फटाक्याचा आवाज करणाऱ्या सायलेन्सर गाड्यांवर वाहतूक पोलीस अधिकारी निलेश माने यांनी भिगवण चौकात कारवाई करत तीसहून अधिक गाड्यांचे सायलेन्सर काढून घेतलेत.. तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या वाहनचालकावर देखील कारवाई करण्यात आलीय.. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे..

चौकट : वाहतूक पोलिसांनी केलेले कारवाई योग्यच आहे मात्र ही कारवाई केली असली तरी यामध्ये वाहतूक पोलिसांनी सातत्य ठेवणे गरजेचे आहे त्याचबरोबर बारामती शहरातील बाजारपेठाच्या ठिकाणी दुकानदार स्वतःच्या दुकानासमोर येथे पार्किंग करू नका असे बोर्ड लावत आहेत ते तातडीने काढण्यात यावेत.. त्याचबरोबर चौकाच्या 50 मीटर कुठलीही वाहने पार्किंग केली जाऊ नयेत याची देखील काळजी घ्यावी जेणेकरून वाहन चालकाला आणि वाहतुकीला कुठलाही अडथळा होणार नाही..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow