दौंड च्या कानगांव येथे शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी रयत क्रांती संघटना स्वातंत्र्य दिनापासून करणार आमरण उपोषण...

Jul 21, 2026 - 09:34
 0  138
दौंड च्या कानगांव येथे शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी रयत क्रांती संघटना स्वातंत्र्य दिनापासून करणार आमरण उपोषण...

शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यासाठी रयत क्रांती संघटना स्वातंत्र्य दिनापासून दौंड च्या कानगांव येथे करणार आमरण उपोषण...

सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे करणार आमरण उपोषण..

 दौंड ( कानगांव ): शेतकऱ्यांचे कृषी कर्ज व विज बिल माफी, सक्तीची कर्ज वसुली थांबवावी, कानगाव येथील सिमेंट कंपनीचे प्रदूषण थांबवावे तसेच दौंड तालुक्यातील रखडलेल्या नळ पाणीपुरवठा योजना संदर्भात त्वरित निर्णय घ्यावेत अशा विविध मागण्यांसाठी रयत क्रांती संघटने मार्फत येणाऱ्या १५ ऑगस्ट २०२६ पासून कानगाव येथील विठ्ठल मंदिरामध्ये सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण व वेगवेगळी आंदोलन करण्यात येणार आहे. सदर मागण्याचे लेखी निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,जिल्हाधिकारी पुणे, पोलीस अधीक्षक पुणे, तहसीलदार दौंड व इतर विभागांना लेखी निवेदन दिल्यात आलेले आहे. अशी माहिती रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी दिली आहे.

राज्य शासनाने आत्तापर्यंत तीन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी केली परंतु अनेक शेतकऱ्यांना अद्यापही या कर्जमाफीचा लाभ झाला नाही. शासनाच्या जाचक अटी व शर्ती मुळे आवश्यक असलेले अनेक शेतकरी या कर्जमाफी माफी पासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यात यावा, तसेच वीज बिल माफी मध्ये एच पी ची अट रद्द करावी. कारण सामुदायिक कृषी पंप धारकांनी साडेसात एच पी पेक्षा मोठ्या एच पी चे कृषी पंप टाकले त्यामुळे असे शेतकरी वंचित राहिले यांच्यावर हा अन्याय होत आहे. तसेच जागतिक आर्थिक मंदीमुळे अनेक शेतकरी व छोटे-मोठे व्यवसाय यांना वेळेत कर्ज भरता आली नाही. अशा शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची छोट्या-मोठे व्यवसाईकांची विविध बँका व फायनान्स मार्फत सक्तीची कर्ज वसुली चालू आहे. त्यामुळे राज्य शासनाने सक्तीची कर्ज वसुली थांबवण्यात यावी. 

तसेच कानगाव पाटस हद्दी मधील असलेली श्री सिमेंट कंपनी व अदानी सिमेंट कंपनी यांच्याकडून मोठ्या प्रमाणात धुळीचे व सिमेंटच्या धुळीचे प्रदूषण होत आहे. तसेच ओव्हरलोड वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्ते खड्डेमय होत आहे. त्यामुळे सदर दोन्ही कंपनी पासून होणाऱ्या प्रदूषण थांबवण्यात यावे व होणारे रस्त्यांचे नुकसान टाळण्यात यावे. तसेच दोन्ही सिमेंट कंपनीने कानगाव ग्रामपंचायत मधून ना हरकत दाखला अधिकृत कायद्याच्या चौकटीत राहून घेतला नाही. त्यामुळे सुद्धा यांच्या वरती ग्रामपंचायत अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी व दोन्ही कंपनीला क्लोजर नोटीस काढून दोन्ही सिमेंट कंपन्या बंद करण्यात याव्यात. तसेच दौंड तालुक्यातील नळ पाणीपुरवठा योजना तब्बल २७ गावातील नळ पाणीपुरवठा योजना ह्या संबंधित योजनेच्या काम पूर्ण करण्याची दोन वर्षे मुदत संपून सुद्धा अधिकचे दोन वर्षे झालं सदर सर्व योजना रखडलेल्या आहेत. त्यामुळे कामांची मुदत संपल्यानंतर ही दोन वर्षे रखडलेल्या दौंड तालुक्यातील २७ गावातील नळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात याव्यात. अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी रयत क्रांती संघटना व संबंधित ग्रामस्थ व शेतकरी यांच्या वतीने कानगांव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये येणाऱ्या स्वातंत्र्यदिना पासून म्हणजेच १५ ऑगस्ट २०२६ पासून आमरण उपोषण व वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने रयत क्रांती संघटना, संबंधित शेतकरी व ग्रामस्थांच्या मार्फत करण्यात येणार आहेत असे लेखी निवेदन देऊन राज्य सरकारला इशारा दिला आहे. रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे, पुणे जिल्हा सरचिटणीस सयाजी मोरे व दौंड तालुका सर्फराज शेख यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

 

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow