राज्याचे दिवंगत लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त झारगडवाडीत रक्तदान शिबीर..

Jul 21, 2026 - 22:45
Jul 22, 2026 - 02:48
 0  81
राज्याचे दिवंगत लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त झारगडवाडीत रक्तदान शिबीर..

राज्याचे दिवंगत लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त झारगडवाडीत रक्तदान शिबीर..

झारगडवाडी : राज्याचे दिवंगत लोकनेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे भावपूर्ण वातावरणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दादांच्या स्मृतीला अभिवादन करत ११९ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवसेवेचा संदेश दिला. गावकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

दरवर्षी अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात असे. मात्र, यंदा प्रथमच त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली. ही वेळ अत्यंत वेदनादायी असून अशी वेळ कधी येईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशा भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

झारगडवाडी येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे सभापती किरण (दादा) तावरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पृथ्वीराज (बापू) जाचक होते. जिल्हाध्यक्ष संभाजी (नाना) होळकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव (नाना) देवकाते, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष संदीप बांदल, जिल्हा परिषद सदस्या शिवानीताई देवकाते, पंचायत समिती सदस्या राजश्रीताई टकले, माजी व्हाईस चेअरमन कैलास गावडे, संचालक सतीश देवकाते, मंथन कांबळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

भव्य रक्तदान शिबिराचे आयोजक!

या सामाजिक उपक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दयाराम महाडिक, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष मासाळ आणि झारगडवाडीचे सरपंच अजित बोरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी निलेश कालगावकर, अविनाश जाधव, हर्षल निकम, अविनाश निकम, नानासाहेब झारगड, नितीन शेडगे, वैशाली मासाळ, नितीन मासाळ, संदीप मासाळ, अभिजीत बिचकुले, संदीप झारगड, अभिजीत झारगड, अजित कारंडे, अमोल यादव यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.

चौकट :

"रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या संदेशाला साजेसा प्रतिसाद देत बारामतीच्या झारगडवाडीत ११९ रक्तदात्यांनी रक्तदान करत रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. अजितदादांप्रती असलेले प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करत रक्तदात्यांनी मानवसेवेच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम झारगडवाडीत प्रेरणादायी ठरला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow