बारामतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यावर फौजदारी व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी..

Mar 27, 2026 - 21:33
 0  70
बारामतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यावर फौजदारी व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी..

बारामतीत मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स ॲक्ट २०१३ कायद्याचे उल्लंघन?..

सुरक्षा साधनांशिवाय कामगारांना मैला काढण्यासाठी उतरवले ड्रेनेज मध्ये..

बारामती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा कामगारांच्या जीवाशी खेळ..

बारामती नगरपरिषद वादाच्या भोवऱ्यात...

बारामतीचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी..

सामाजिक कार्यकर्ते अभिजित कांबळे यांनी केलीय मागणी..

बारामती : बारामतीत एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.. मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स अक्ट ( रोजगारावर बंदी आणि त्यांचे पुनर्वसन कायदा ) २०१३ या कठोर कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा आरोप बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यावर करण्यात आला आहे.. नगरपरिषदेच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान सफाई कर्मचाऱ्यांना कोणतीही सुरक्षा साधने—जसे की ऑक्सिजन किट, मास्क, हातमोजे किंवा गमबूट— न देता थेट ड्रेनेजच्या धोकादायक हौदामध्ये उतरवले जात आहे.. 

विशेष म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आणि २०१३ चा कायदा असतानाही बारामती नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा कामगारांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.. नगरपरिषदेतील सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे ऑडिट करण्यात यावे या प्रकरणी बारामतीचे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक कांबळे यांनी बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांच्यावर फौजदारी गुन्हा आणि ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow