उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

Jul 23, 2026 - 22:21
 0  29
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसीमध्ये स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते बारामती एमआयडीसी परिसरात स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, तहसीलदार स्वप्नील रावडे, कार्यकारी अभियंता विजय पेटकर यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.

कोट : समाजहिताच्या उपक्रमांमधून दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याला अभिवादन करण्याचा हा एक अर्थपूर्ण प्रयत्न असून स्वच्छ व सुंदर बारामती घडविण्यासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेऊन स्वच्छतेची सवय अंगीकारावी, असे आवाहन श्रीमती सुनेत्रा पवार यांनी केले..

कोट : बारामती एमआयडीसी परिसर स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी उद्योग, कर्मचारी आणि नागरिकांच्या संयुक्त सहभागातून नियमित स्वच्छता उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उद्योग क्षेत्रात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करून पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे मत हनुमंत पाटील यांनी व्यक्त केले..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow