ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन..

Dec 9, 2025 - 06:25
 0  48
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे दीर्घ आजाराने निधन..

कामगार संघटना वंचितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कष्टकऱ्यांचे बाबा हरपले.

आयुष्यभर कामगार संघटना आणि वंचितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे श्रमिक चळवळीतील अग्रणी कोरोनावर लस येईल परंतु भारतातील जातीव्यवस्थेवर लस निघेल का असा सवाल विचारणार आहे कष्टकऱ्यांचे बाप असलेले बाबासाहेब पांडुरंग तथा डॉक्टर बाबा आढाव यांचे वयाच्या 95 व्या वर्षी दीर्घ आजाराने सोमवारी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.

बाबा आढाव यांना प्रकृती अचानक बिघडल्यामुळे बारा दिवसापूर्वी खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते त्यांची किडणी निकामी झाली होती. सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे त्यामध्ये प्राणज्योत मालवली. डॉक्टर बाबा आढाव यांचे पार्थिव मंगळवारी 9 डिसेंबर सकाळी दहा वाजता त्यांच्या चळवळीचे केंद्र असलेल्या मार्केट यार्ड येथील हमाल भवन येथे दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सायंकाळी 5:30 वाजता कोणतेही धार्मिक विधी न करता वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युत दाहीनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. 

बाबा आढाव यांचा जन्म एक जून 1930 रोजी पुण्यात झाला प्राथमिक शिक्षण नगरपालिकेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी मराठा हायस्कूल मध्ये झाले. त्यानंतर त्यांनी रसायनशास्त्राची पदवी संपादन केले आणि 1952 मध्ये ताराचंद रामनाथ आयुर्वेद महाविद्यालयात दाखल झाले तेथे त्यांनी वैद्य शास्त्राचे पदविका मिळवली त्यांच्या लहानपणीच पितृछत्र हरपल्याने बाबा आणि त्यांच्या भावंडाचे संगोपन त्यांच्या आईने आजोळी राहून केले बाबाचे मामा बापूसाहेब झेंडे यांनी त्यांना छत्रछाया दिली आणि त्यांचे संगोपन हे केले बाबांचे कौटुंबिक पार्श्वभूमी चळवळीचीच होती. त्यांच्या आजोबा सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळीतील आघाडीचे नेते होते हायस्कूलमध्ये शिकत असताना बाबांचा राष्ट्रसेवा दलाशी संपर्क आला 1943 ते 50 या काळात ते नियमितपणे शाखेत जात. रात्रीच्या कामगार शाखांचे ते संघटक म्हणून काम पाहत असत त्यातूनच आम्हाला बरोबरचा त्यांचा संपर्क वाढला त्यांचे प्रश्न त्यांचे कौटुंबिक स्थिती त्यांचे प्रश्न या सगळ्यांनी ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी आम्हालांची संघटना बांधली तेथूनच त्यांचा सामाजिक चळवळीचा श्री गणेशा झाला. त्यानंतर 1955 मध्ये बाबांनी आम्हाला ना संघटित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले पहिली असंघटित कामगार संघटना हमाल पंचायतची 1963 मध्ये स्थापना केली बाबा पुणे मतदारसंघातील भवानी पेठ चे नगरपालिका नगरसेवक म्हणून निवडून आले त्यावेळी त्यांनी झोपडपट्टी वास यांच्या पुनर्वसनासाठी आवाज उठवला आणि त्यांचे अनेक प्रश्न सोडवून त्यांना हक्क मिळवून दिला. अशा हमाल मापाडी संघटनांचे कामगारांचे नेते डॉक्टर बाबा आढाव देवाघरी गेले अशा थोर कामगार नेत्याला सर्वच स्तरातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.

डॉ. बाबा आढाव यांचे साहित्य..

बाबा आढाव यांनी सामाजिक चळवळी आणि कष्टकरी वर्गाचे जीवन दर्शवणारे महत्त्वपूर्ण लेखन केले आहे. त्यांच्या प्रमुख पुस्तकांमध्ये ‘एक गाव – एक पाणवठा’,त्यांचे आत्मचरित्रात्मक लेखन ‘मीच तो माणूस’ आणि ‘एक साधा माणूस’, ‘जगरहाटी’, ‘रक्ताचं नातं’, ‘असंघटित कामगार : काल, आज आणि उद्या’, ‘जातपंचायत : दाहक वास्तव’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक चिंतन’ ही काही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर खोल प्रभाव पाडला. बाबा आढाव यांच्या समाज कार्यात या पुस्तकांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता बाबा आढाव आपल्यात नाहीत. त्यांचे हे साहित्य आगामी पिढ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow