बारामती तालुक्यातील निरावागज गावचे नागरिक मतदानावर घालणार बहिष्कार
बारामती तालुक्यातील निरावागज गावचे नागरिक मतदानावर घालणार बहिष्कार..
रस्ता आणि रस्त्यावरील खड्डे बुजवले जात नसल्याने पाचशे मतदार मतदानावर घालणार बहिष्कार...
बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देत केली मागणी..
बारामती : बारामती तालुक्यातील निरावागज गावातील नागरिकांनी बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानावरती बहिष्कार घालण्याचा पवित्रा घेतला आहे.. निरावागज पन्हाळे, कुंभार वस्ती या ठिकाणी येणाऱ्या रोडवरती मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि वयोवृद्ध नागरिकांना रस्त्यावरून ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे.. अनेक वेळा पाठपुरावा करून देखील रस्ता दुरुस्त केला जात नाही यामुळे आता दोन दिवसात या रोडवरील खड्डे डांबरीकरणाने बुजवावेत अन्यथा येथील 500 नागरिकांनी बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे..
निरावागज पन्हाळे, कुंभार वस्ती या ठिकाणी येणाऱ्या रोडवरती मोठमोठे खड्डे पडले आहेत.. याबाबत निरावागज ग्रामपंचायत, संबंधित प्रशासनाला वेळोवेळी रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.. मात्र संबंधित प्रशासन वेळोवेळी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे यामुळे आता निरावागज पन्हाळे, कुंभार वस्ती वरील राहणाऱ्या नागरिकांनी बारामती पोटनिवडणूकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे निवेदन बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिले आहे.. यामुळे आता बारामतीच्या निवडणूक निर्णय अधिकारी नागरिकांची मागणी पूर्ण करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे..
What's Your Reaction?