सोमेश्वरच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले! दादांच्या स्मृतींना अभिवादन; जय पवारांसह पॅनलचे सर्व उमेदवार मैदानात..
सोमेश्वरच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले! दादांच्या स्मृतींना अभिवादन; जय पवारांसह पॅनलचे सर्व उमेदवार मैदानात..
दादांचा वारसा, विकासाचा निर्धार; सोमेश्वरच्या निवडणूक रणांगणात युवा नेते जय पवार यांची दमदार एन्ट्री..
सोमेश्वरच्या विकासाची वाटचाल पुढे नेण्याचा निर्धार..
मयुर बोरकर....
बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष स्वर्गीय अजितदादा पवार पॅनल’च्या निवडणूक प्रचाराचा भावनिक आणि श्रद्धापूर्ण प्रारंभ करण्यात आलाय.. युवा नेते जय अजितदादा पवार यांच्यासह पॅनलच्या सर्व उमेदवारांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलेय.. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना नमन करून सोमेश्वरच्या विकासाची परंपरा पुढे नेण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी बोलताना जय पवार म्हणाले, “दादा आज आपल्यात नाहीत; मात्र सोमेश्वरच्या प्रत्येक घडामोडीत त्यांची आठवण, त्यांच्या कार्याचा ठसा आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा कायम आहे. १९९१ पासून सोमेश्वरच्या विकासाचा प्रवास दादांनी आपल्या कर्तृत्वाने घडवला.” “दादांनी जपलेला विश्वास कायम ठेवणे आणि त्यांनी दाखवलेल्या विकासाच्या वाटेवर सोमेश्वरला पुढे घेऊन जाणे, हीच आमची जबाबदारी आहे. त्यांच्या स्मृतींना नमन करून आणि त्यांची प्रेरणा सोबत घेऊन आम्ही नवा निर्धार, नवी उमेद आणि नवी जबाबदारी घेऊन या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहोत,”aa सोमेश्वरच्या विकासासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करत त्यांनी पुढे सांगितले, “दादा, तुमची उणीव कायम जाणवेल; मात्र तुमचे विचार, तुमचे कार्य आणि तुमची प्रेरणा सदैव आमच्या सोबत राहील.”
स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष स्वर्गीय अजितदादा पवार पॅनल’च्या सर्व उमेदवारांनी एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आला असून, या निवडणुकीत तिरंगी लढत होणार असून आगामी काळात ही निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
What's Your Reaction?