इंदापूर : कर्मयोगी शंकरराव पाटील सह. सा. कारखान्याने दिला 3350 उच्चांकी दर..

Dec 8, 2025 - 22:07
Dec 8, 2025 - 22:31
 0  156
इंदापूर : कर्मयोगी शंकरराव पाटील सह. सा. कारखान्याने दिला 3350 उच्चांकी दर..

इंदापूर : कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना ओंकार शुगर लिमिटेडचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी चालवण्यासाठी घेतला आणि पहिल्याच ऊस गाळप हंगामात दिला पुणे जिल्ह्यातील उच्चांकी दर..

प्रतिटन 3350 रुपये यंदाच्या ऊस गाळप हंगामात दर देऊन इतर कारखान्यांना टाकले मागे..

कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि ओंकार शुगर लिमिटेडचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक दर कर्मयोगी कारखाना देईल अखेर या आश्वासनाची पूर्ती आज करण्यात आली आहे.. 2025-26 च्या ऊस गाळपासाठी कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना लि. आणि हा कारखाना चालवण्यासाठी घेतलेले सहयोगी ओंकार शुगर अँड डिस्टिलरी युनिट नंबर 11 यांनी शेतकऱ्यांना प्रति टनासाठी 3350 रुपये ऊस दर जाहीर केला आहे.. यातील पहिला हप्ता 3200 तर उर्वरित 150 रुपये दीपावलीला दिला जाणार आहे पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उच्चांकी दर कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याने जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.. 

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि कारखान्याचे चेअरमन असलेल्या माळेगगांव साखर कारखान्याने या हंगामातील उसाच्या गळितासाठी पहिली उचल 3300 रुपये जाहीर केली असून कर्मयोगीने एक पाऊल पुढे टाकत 3350 रुपये दर जाहीर केला आहे..

पुणे जिल्ह्यातील माळेगांव, छत्रपती सोमेश्वर सहकारी साखर कारखाना हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालवले जातात. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे माळेगाव कारखान्याचे चेअरमन आहेत. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस दर देण्याची परंपरा ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंत राखली आहे. यावर्षीची पहिली उचल माळेगाव सहकारी साखर कारखान्याने 3300 रुपये जाहीर केली असून कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने मात्र एक पाऊल पुढे टाकत 3350 रुपये प्रति टन म्हणजेच माळेगाव पेक्षा 50 रुपये ज्यादा दर घोषित केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे..

कर्मयोगी कारखान्याला हिनावून राज्यकर्ते मारत होते बोंब; मात्र आता कर्मयोगीने उच्चांकी भाव देऊन राज्यकर्त्यांनाच मारायला लावलीय बोंब...

इंदापूर तालुक्याचे शिल्पकार खासदार स्वर्गीय शंकररावजी बाजीराव पाटील यांनी बिजवडीच्या माळरानावर कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे रोपटे उभा केले. आज या कारखान्याला 25 वर्षाहून अधिक काळ लोटला गेला. या कालखंडात राज्यकर्त्यांकडून नेहमीच या कारखान्याची कोंडी केली गेली. मागील दहा वर्षापासून कर्मयोगी कारखाना अडचणींचा सामना करतोय. शेवटी कारखाना पूर्वपदावर आणायचा असेल तर सहकाराला खाजगी व्यावसायिकाची जोड द्यायची आणि स्पर्धेच्या युगात दोन पावलं पुढे टाकायची हे धोरण स्वीकारून कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी हा कारखाना ओंकार शुगर या ग्रुप कडे करार पद्धतीने चालवण्यास देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या निर्णयावरून वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चाही झाल्या, अनेक राजकीय नेत्यांनी या मुद्द्यावरून हर्षवर्धन पाटील यांना लक्ष केलं. मात्र याच कर्मयोगी कारखान्याने आज जे नेते हर्षवर्धन पाटील यांना कर्मयोगी वरून लक्ष करत होते, त्यांच्या ताब्यातील असणाऱ्या कारखान्यांपेक्षा अधिकचा दर देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा दाम देऊन मोठा दिलासा दिला आहे..

चौकट : कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याने उच्चांकी दर जाहीर केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.. मात्र दुसरीकडे पुणे जिल्ह्यातील इतर कारखाना चालवणारांची डोकेदुखी वाढली आहे अडचणीत असलेला कारखाना जर सर्वाधिक दर देत असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना जादाचा दर का देऊ शकत नाही असा प्रश्न आता ऊस उत्पादक शेतकरी कारखाना संचालक मंडळाला विचारल्याशिवाय राहणार नाही..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow