पवार साहेबांमुळेच बारामतीचा विकास व जगाच्या नकाशावर बारामतीचे नांव..

Dec 16, 2025 - 18:56
Dec 16, 2025 - 18:58
 0  154

#M TV मराठी. ( #mtvmarathi.Com )

बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत लोकसभेप्रमाणेच तुतारीची सुप्त लाट..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला युगेंद्र पवार यांचे उमेदवार देणार टक्कर..

बारामती नगर परिषदेवर अनेक वर्षापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे.. दोन्ही राष्ट्रवादी स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच ही बारामती नगरपरिषदेची निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होत आहे.. यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुतारीच्या चिन्हावर अनेक उमेदवार उभे केले आहेत.. युवा नेते युगेंद्र पवार यांनी स्वतः काही प्रभागांमध्ये प्रचार रॅली काढत तुतारीच्या उमेदवारांना विजयी करा अशी विनंती त्यांनी बारामती करांना केली आहे.. बारामतीत सुप्रियाताई सुळे यांच्या लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान जशी सुप्त लाट पाहायला मिळाली आणि सुप्रिया सुळे यांना वीस हजाराहून अधिकचे मतदान करून बारामती करांनी लीड दिले.. तीच सुप्त लाट आता बारामती शहरांमध्ये बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत आहे...

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow