बारामतीत अजितदादांचा स्थानिक प्रवक्ता पत्रकारांच्या बाबत बरळला

Dec 13, 2025 - 23:38
Dec 14, 2025 - 10:19
 0  119

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थानिक प्रवक्ता बरळला..

पत्रकारांनी सुपारी घेऊन बोलायचं नाही बातम्या करायच्या नाही.. 

यावर पत्रकार आक्रमक होताच आयोजित केलेली पत्रकार परिषद तालुकाध्यक्षांनी गुंडाळली..

बारामतीत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहयोग सोसायटीच्या समोर भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं.. या आंदोलनाला वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्रभर प्रसिद्ध दिली यामुळे बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचा थयथयाट झाला.. यावर बारामतीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पत्रकार परिषद घेत भाजप युवा मोर्चाच्या आंदोलनाची दखल घेतली हे आंदोलन योग्य नव्हतं अशी भूमिका मांडली.. याच पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता अजित मासाळ याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्याला वाहवाहा मिळावी या हेत्तूने त्याने पत्रकार हे सुपारी घेऊन बोलतात बातम्या करतात असं बेताल वक्तव्य करत पत्रकारांवरच आरोप केला.. यावर पत्रकार आक्रमक होताच तालुका अध्यक्ष संदीप बांदल यांनी आयोजित पत्रकार परिषद गुंडाळली... अश्या बेताल वक्तव्य करणाऱ्या स्थानिक प्रवक्त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज द्यावी अशी मागणी पत्रकारांनी केली आहे...

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow