बारामतीतील कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी पर्वणीच माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन

Jan 24, 2026 - 08:12
 0  22
बारामतीतील कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकऱ्यांसाठी पर्वणीच माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचे प्रतिपादन

बारामतीतील कृषी प्रदर्शनाला माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली भेट..

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. आज खानदेश भागामधील जळगाव, नाशिक, धुळे आदी जिल्ह्यांमधून तसेच कर्नाटक, तेलंगणा येथील शेतकऱ्यांनी प्रदर्शन स्थळी मोठी गर्दी केली होती.या प्रदर्शनास माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी भेट दिली. त्यांचे स्वागत ट्रस्टचे चेअरमन राजेंद्रदादा पवार यांनी केले. यावेळी खडसे यांनी प्रक्षेत्रावरील विविध दालनांना भेटी देत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती घेतली. सोलर पॉलीहाउस, एआय आधारित कांदा, ऊस, द्राक्षे, डाळिंब प्रात्यक्षिके तसेच जनावरांचे प्रदर्शन या दालनांना त्यांनी भेटी दिल्या.

कर्नाटक राज्याचे कृषी सहसंचालक, कृषी विज्ञान केंद्र (बेळगाव) येथील प्रमुख अधिकारी व शेतकरी यांनी देखील प्रदर्शनास भेट देत विविध तंत्रज्ञानाची माहिती घेतली. तसेच माजी कृषी व रेशीम आयुक्त, तेलंगणा राज्य श्री. व्यंकट राम रेड्डी यांनी देखील प्रदर्शनास भेट दिली. प्रदर्शनातील बिना आवाजाचे इलेक्ट्रिक (EV) ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचे विशेष आकर्षण ठरले. आंतरमशागत, नांगरणी, रोटावेटर आदी कामांसाठी उपयुक्त असलेल्या २७ व ३२ अश्वशक्तीच्या ट्रॅक्टरची माहिती घेण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसून आले. डिझेलची आवश्यकता नसल्याने हे ट्रॅक्टर एका चार्जिंगमध्ये सुमारे ४ तास कार्यक्षम राहतात. केवळ रु. २३०/- इतक्या कमी खर्चात चार्जिंग होत असल्याने शेतकऱ्यांचा या तंत्रज्ञानाकडे विशेष ओढा दिसून आला.

ज्ञानवर्धक, तंत्रज्ञानाधारित व अनुभवसमृद्ध ठरणारे हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना आधुनिक, किफायतशीर व शाश्वत शेतीच्या दिशेने मार्गदर्शन करणारे ठरत आहे. सदर कृषी प्रदर्शन शनिवार, दि. २४ जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow