माळेगांव सहकारी साखर कारखान्याने उसाला पहिली उचल दिली 3300 रुपये
उपमुख्यमंत्री आणि कारखान्याचे अध्यक्ष अजित पवार असलेल्या माळेगाव कारखान्याने उसाला पहिली उचल केली जाहीर..
२०२५-२६ हंगामातील उसाच्या गळितासाठी पहिली उचल प्रतिटन दिला ३३०० रुपये भाव..
बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याने चालू ऊस गळीत हंगामासाठी प्रति टनाला 3300 रुपये दर जाहीर केला आहे.. या कारखान्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार अध्यक्ष आहेत.. त्यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत 3300 रुपये दर जाहीर करण्यात आला आहे.. गेल्या काही दिवसांपासून सभासद शेतकऱ्यांमध्ये माळेगाव कारखाना साखरेच्या पहिल्या उचल रकमेबाबत काय भूमिका घेणार? याबाबत उत्सुकता होती.. विशेषतः पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर, छत्रपती सहकारी साखर कारखान्याने त्यांच्या उचल रकमेची घोषणा केल्यानंतर माळेगाव कारखान्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.. अखेर संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली आणि शेवटी शेतकऱ्यांच्या हितासाठी ३३०० रुपये प्रति टन इतकी उचल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला.. याबाबतची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.. या घोषणेमुळे परिसरातील शेतकरीवर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे..
What's Your Reaction?