अजितदादांच्या बारामतीत छगन भुजबळ यांना बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने केलं जातंय का टार्गेट..?

Dec 14, 2025 - 20:33
Dec 15, 2025 - 05:13
 0  354

बारामतीत नगरपरिषद निवडणूकीत आता ओबीसी फॅक्ट्रर विरुद्ध मराठा फॅक्ट्रर होणार लढत?..

राज्य शासनाच्या वतीने मराठा समाजाला कुणबी चे आरक्षण देऊन ओबीसी वर अन्याय केला.. या संदर्भात ओबीसी नेते छगन भुजबळ प्रा. लक्ष्मण हाके, ॲड. मंगेश ससाने, यांनी राज्यभर आरक्षण बचावासाठी आंदोलन करत अनेक ठिकाणी सभा घेतल्या.. 

बारामतीत काही दिवसापूर्वी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी देखील ओबीसी आरक्षण बचावासाठी मोर्चा काढला होता.. या मोर्चामध्ये हजारो ओबीसी बांधव एकवटले होते या दरम्यान ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके, ॲड. मंगेश ससाने यांच्यासह 14 जणांवर बारामती शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.. यामुळे ओबीसी बांधवांनी बारामती लोकप्रतिनिधीच्या हस्तक्षेपामुळेच गुन्हे दाखल झाले असा आरोप केला होता.. 

सध्या बारामती नगर परिषदेची निवडणूक सुरु आहे.. यातील प्रचार शिगेला पोहचला आहे यामध्ये काही जण ओबीसी नेते छगन भुजबळ, यांना टार्गेट करत असल्याचे स्पष्ट होत आहे.. काहीजण तर तुमच्या छगन भुजबळाना सांग अशी वक्तव्य करू लागली आहेत यामुळे आता बारामतीतला ओबीसी बांधव पेटून उठणार का औचित्याचा प्रश्न आहे.. या निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळतो की काय असा देखील प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.. यामुळे आता येणाऱ्या 20 डिसेंबर च्या मतदानाच्या दिवशी मतदार राजा कुठल्या पक्षाला कौल देतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow