प्रत्येक राज्यात एक उपपंतप्रधान नियुक्त करावे रयत क्रांती संघटनेच्या राज्य प्रवक्त्याची अनोखी मागणी..
प्रत्येक राज्यामध्ये एक उपपंतप्रधान नियुक्त करावे. रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांची मागणी..
भारतामध्ये प्रत्येक राज्यांमध्ये एक उपपंतप्रधान पद तयार करून प्रत्येक राज्यांमध्ये एक उपपंतप्रधान नेमण्यात यावं अशा प्रकारची मागणी रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी पत्राद्वारे देशाचे पंतप्रधान व राष्ट्रपती यांना केली आहे. जगामध्ये लोकसंख्येमध्ये एक नंबर असलेल्या भारत देशामध्ये २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. प्रत्येक राज्याची समस्या तसेच आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय परिस्थिती वेगवेगळी आहे. वास्तविक पाहता भारतामध्ये संविधानिक स्तरावरती देशात व राज्यात शासन प्रशासन व न्यायव्यवस्था आहे.परंतु देशाच्या व राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी कमी पडत आहे. कारण प्रत्येक विभागाची व राज्याची भौगोलिक व सांस्कृतिक पद्धत वेगळी असून त्यांच्या विकासाची ध्येय धोरणे सुद्धा वेग वेगळी आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक राज्यांमध्ये गेली ३० ते ४० वर्षे झालं तेच तेच पक्ष व तेच तेच आमदार, खासदार ,मंत्री यामुळे व्यवस्थेमध्ये ढिसाळपणा आला असून अनेक ठिकाणी प्रस्थापित व्यवस्थेचा उपयोग जनतेच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी न करता व्यक्तिगत पक्ष, व व्यक्तिगत पातळीवर केला जातो. शासन म्हणून व प्रशासन म्हणून किंवा न्यायव्यवस्था म्हणून पूर्वीप्रमाणे दबदबा राहिला नाही. तर दुसऱ्या बाजूला देशांमध्ये अनेक व्यक्ती प्रत्येक क्षेत्रातल्या अभ्यासू व सामाजिक विकासाला प्राधान्य देणाऱ्या अनेक व्यक्ती देशांमध्ये व राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांमध्ये सामाजिक काम करत आहेत. परंतु सदर व्यक्ती निवडणूक लढू शकत नाही व निवडून येऊन शासन प्रशासनामध्ये काम करू शकत नाहीत . राज्य व केंद्रातील राजकीय परिस्थिती कमालीची गोंधळलेली व बिघडलेली आहे. या राजकीय सत्तेमधून राज्याचे ,देशाचे व जनतेचे कल्याण करण्याची भावनाच राहिलीच नाही. त्यामुळे राजकारण विरहित अनेक वर्ष देशभरात सामाजिक ,आर्थिक सांस्कृतिक,पर्यावरणीय विभागांमध्ये नि : स्वार्थपणे काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत .अशा सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींना त्या त्या राज्यांमध्ये उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती केल्यास निश्चित राज्यातील व देशातील आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल.यामध्ये शंका नाही . अशा स्वरूपाच्या मागणीचे पत्र रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते भानुदास शिंदे यांनी देशाच्या राष्ट्रपती महोदया द्रौपदी मुर्मू व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाद्वारे पाठवले आहे.
What's Your Reaction?