बारामती : - स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ "एक झाड दादांसाठी" रुई गावात संकल्प सुरू..!

Feb 13, 2026 - 18:09
Feb 13, 2026 - 18:11
 0  30
बारामती : - स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ "एक झाड दादांसाठी" रुई गावात संकल्प सुरू..!

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ "एक झाड दादांसाठी" रुई गावात संकल्प सुरू..!

मयुर बोरकर..

बारामती : स्वर्गीय अजितदादा पवार यांचे निसर्गावरती तसेच झाडांवरती असलेले प्रेम लक्षात घेता त्यांच्या स्मरणार्थ "एक झाड दादांसाठी" संकल्प सुरू करत रुई गावात (दि:९) रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बारामती नगर परिषदेचे नगरसेविका तथा उपगटनेते सौ. संपदा सुमित चौधर तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस प्रा. आजिनाथ चौधर यांच्या संकल्पनेतून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याचा प्रमुख उद्देश म्हणजे अजितदादा पवार निसर्गप्रेमी होते. विकासाभिमुख बारामती बरोबरच स्वच्छ सुंदर बारामती ही त्यांची संकल्पना कृतीत उतरविणे असा होता. त्यामुळे दादाच्या स्मारणार्थ त्यांची आठवण कायम रहावी यासाठी वृक्षारोपण आयोजित करण्यात आले. यावेळी सर्वांनुमते गावच्या परिसरात वृक्षारोपण करून निसर्ग फुलविणे, परिसराच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे, जनसामान्यांपर्यंत दादांचे विचार पोहोचविणे असे विविध संकल्प करण्यात आले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांचे २८ जानेवारी रोजी एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले, ज्यामुळे संपूर्ण राज्यात मोठी शोककळा आणि हळहळ व्यक्त केली जात आहे . त्यानंतर राज्यभरात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.दादांच्या निधनानंतर बारामतीत सर्वपक्षीय शोकसभा तसेच अनेक समाजांच्या प्रतिष्ठानच्या वतीने शोकसभा आयोजित करुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर काहींनी स्व: अजितदादा पवार यांना बारामती कलाकारांच्या वतीने गाणे गात सुरमयी अशी श्रद्धांजली अर्पण केली. तर बारामती रुई गावच्या ग्रामस्थांनी एक झाड दादांसाठी असा संकल्प करत वृक्षारोपण करत दादांना आदरांजली अर्पण केली.

या प्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष अभिजीत घाडगे, नगरसेवक विष्णुपंत चौधर, माजी उपसरपंच मच्छिंद्र चौधर, बबन चौधर, नवनाथ चौधर, सत्यवान चौधर, दत्तात्रय चौधर, ज्ञानदेव साळुंखे, विठ्ठल चौधर, महेश चौधर, गुलाब चौधर, मनोज चौधर, लालासो चौधर, जगन्नाथ चौधर, दादासो चौधर, नानासो चौधर, यासह रुई गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow