इंदापूर : निरा भिमा कारखान्याने दिला उसाला 3101रुपये उच्चांक भाव.

Dec 7, 2025 - 17:54
 0  50
इंदापूर : निरा भिमा कारखान्याने दिला उसाला 3101रुपये उच्चांक भाव.

नीरा भीमा साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांना प्रति टन 3101 रु उच्चांकी भाव..

इंदापूर तालुक्यातील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालू 2025-26 रौप्यमहोत्सवी गळीत हंगामात शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति टन रु. 3101 अशी उच्चांकी विना कपात रक्कम शुक्रवारी जमा केली. शेतकऱ्यांना आणखी चांगला ऊस दर देता यावा, यासाठी चालू हंगामातील 7 लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन कारखान्याचे संस्थापक आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. शहाजीनगर येथील संवाद कार्यक्रमात शेतकऱ्यांनी पाटील आणि अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांचा सत्कार केला. कारखान्याने 34 दिवसांत 2 लाख मे.टन गाळप तर एका दिवसात 6400 मे.टन गाळपाचा नवा उच्चांक नोंदवला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow